स्वररंगची स्थापना 2008 यावर्षी झाली स्थापन करण्या मागचा उद्देश सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक योगदान देण्याचा राहिला आहे आम्ही पहिला उपक्रम केला तो रंग सणांचा ही कलाकृती सादर करून या कलाकृतीमध्ये जवळजवळ 80 कलाकारांनी भाग घेतला होता ही कलाकृती पेणकरानी उचलून धरली
स्वररंगच्या माध्यामातून आत्तापर्यंत 17 वर्षाहून अधिक काळ आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाची ऑलिंपिक पेण फेस्टिवलच्या माध्यमातून यशस्वीरित्या करत आलेलो आहोत या कार्यक्रमांमध्ये छोट्या मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी सर्वकाही हे तत्व समोर ठेवून उपक्रम राबवत आहोत त्यामुळे सर्व पेणकर पेण फेस्टिवलची दरवर्षी वाट पाहत असतात
पेण फेस्टिवल हे फक्त मनोरंजनासाठी नाही आहे तर कलाकारांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी आहे या माध्यमातून बरेचसे कलाकार टीव्ही प्रोग्राम सिनेसृष्टी मध्ये चमकत आहेत कलाकारांना प्राधान्य देणे या उद्देशा बरोबरच क्रीडा, फिटनेस तसेच व्यवसायिकांना उद्योजकांना सुद्धा याचा लाभ मिळणे हा आहे
हे करत असताना सामाजिक बांधिलकी जपणे हा आमचा मुख्य उद्देश आहे गेल्या 17 वर्षा मध्ये पेणकरानकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग घेतला याबद्दल आभार मानावे तितकेच कमी आहेत यापुढेही आम्ही वेगवेगळ्या संकल्पना घेऊन दर्जेदार कलाकृती पेण मध्ये सादर करू आणि आमचा वारसा जपू